सरकारी तांत्रिक अडचणीमुळे रायगडातील शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित,
पे-युनिटचे अक्षम्य दुर्लक्ष!
शिक्षक संघटना मूग गिळून गप्प, नेतृत्व पडतय कमी!
रायगड (विशेष प्रतिनिधी) 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्ती होऊनही केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना D.C.P. S व नंतर काही काळांनी NPS ही योजना लागू केली.खर तर ही योजना 2005 नंतर शासकीय सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असताना देखील रायगड जिल्ह्यात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे लागू झाली आहे. तुलना करता राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये अशी परिस्थिती नाही. इतर जिल्ह्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे P F कपात सुरळीतपणे सुरु आहे .हा केवढा फरक आहे. त्यातही रायगड जिल्ह्यातही काही शाळांतील कर्मचाऱ्यांचे P F कपात सुरळीतपणे सुरू आहे. ही पे -युनिट ची विरोधी ,दुटप्पीपणाची भूमिका आहे.
दिवाळी सणाचा आनंद घेण्यासाठी शासनाने दिवाळी पूर्वी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव 5% महागाई भत्याचा फरक देण्यासाठी परिपत्रक काढले.हा महागाईचा फरक सर्व कर्मचाऱ्यांना दयायचा होता मात्र रायगड जिल्ह्याच्या पे -युनिटने एक स्वतंत्र परिपत्रक काढून NPS योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांना Tab उपलब्ध नाही हे तांत्रिक कारण सांगून महागाई भत्याच्या फरकापासून वंचित ठेवण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी या महागाई भत्ता फरकापासून वंचित राहिले आहेत.या कर्मचाऱ्यांचा दिवाळीच्या सणाचा आनंद हिरावून घेतल्या सारखा आहे. शिक्षकांचे हित जपणाऱ्या आज अनेक संघटना आहेत पण मूग गिळून गप्प आहेत .नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे.
खर तर 1 नोव्हेंबर2005 पूर्वी नियुक्ती होऊनही केवळ 100% अनुदान 2005 पूर्वी मिळाले नाही हे कारण पुढे करून संबंधित कर्मचाऱ्यांना DCPS व NPS या सारख्या निर्दयी योजना लागू केली .हे करत असताना संबंधित कर्मचाऱ्यांचे अर्ज भरताना *नियुक्ती दिनांक * बदलली.हा संबंधित कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय आहे ,तसेच पे युनिटने केलेला अधिकाराचा दुरुपयोग आहे.असाही संतप्त सवाल संबंधित कर्मचाऱ्यांच्या मनात आहे.एवढे होऊनही संबंधित कर्मचाऱ्यांना आजपर्यंत PF अथवा GPF कपातीच्या कोणत्याही प्रकारचा पावत्या पे-युनिट कडून दिल्या गेल्या नाहीत. याचेही कारण पे युनिट तुम्हाला जूनी पेन्शन योजना लागू नाही हे कारण पुढे करते.खर तर या PF च्या पावत्या त्या -त्या वर्षी दिल्या असत्या तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती .यामुळे संबंधित कर्मचाऱ्याची संघटना दिवाळी नंतर तीव्र आंदोलन करणार आहेत.मात्र या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देणे व नेतृत्वाला बळकटी देण्याची गरज आहे.
दरम्यान या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.बाळाराम पाटील यांनी लक्ष घातल्याचे कळते मात्र या संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला हवे आहे.
Comments
Post a Comment