कोलाड मध्ये मटका जुगारावर धाड
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी मुद्देमाल जप्त गुन्हा दाखल
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशी की दिनांक 27 सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलिसांनी मौजे वरसगाव गावच्या हद्दीत पद्मावती नगर तलाठी ऑफिस लगत वळणावर डांबरी रोडवर आरोपी संदेश जाधव वय 24 वर्षे रा. सिद्धाई अपार्टमेंट र्रोहा मूळ गाव माणगाव हा वरील तारखेच्या वेळी या ठिकाणी स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका जुगार हारजितीचा खेळ खेळविताना अजून आला आढळून आला सदर इसमाकडू चिट्ठयांचा बंच प्रत्येक चिठ्ठीवर लिहिलेले कल्याण लिहिलेले मजकूर आढळून आला.
सदर सदर इसमावर कोलाड पोलीस ठाण्यात पोस्टेगुर नं 0078 /2021 जुगार अधिनियम1867 कलम 12 अ प्रमाणे कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एस. ए. विघ्ने व कोलाड पोलीस पथक करीत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे व कोलाड पोलिसांचे या धडाकेबाज कामगिरीचे कोलाड परिसरातून अभिनंदन होत आहे.
वा जाधवसाहेब जबरदस्त कामगीरी आपले व आपल्या सर्व टिमचे मना पासून अभिनंदन तसेच भिवा पवार साहेब आपलेही अभिनंदन
ReplyDeleteमनपूर्वक धन्यवाद
Delete