ऐनघर ग्राम पंचायत दफ्तर पळवापळवी प्रकरणी दोषींवर तत्काळ कारवाही करावी ग्रामस्थांची मागणी,
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुका ऐनघर ग्रामपंचायतीच्या दफ्तर पळवापळवी प्रकरणाला आठ दिवस उलटूनही याप्रकरणी दोषी आढळून आलेले ऐनघरचे ग्रामविकास अधिकारी राजू डेरे व इतरांवर आजपर्यँत कोणतीही कारवाई झालेली नाही. या प्रकरणातील संबधित सर्व दोषींवर कारवाही होण्यास अधिक विलंब होत असल्याने यांच्यावर तत्काळ लवकरात लवकर कडक कारवाही करण्यात यावी या करिता ऐनघर ग्राम पंचायत हद्दीतील दिनेश कातकरी,धर्मेंद्र शिद, मंगेश लाड,सतीश सुटेंसह सामान्य ग्रामस्थ नागरिकांनी रोहा गट विकास अधिकारी पं.स.रोहा यांना लेखी निवेदन सादर केले आहे .
ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले निवेदन |
सदरच्या ग्राम पंचायत बाबत तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात गाजत असलेल्या सध्या उलट-सुलट या अनागोंदी कारभाराच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच आता याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यास विलंब होत आहे दफ्तर पळवापळवी प्रकरणी आढळून आलेल्या दोषींवर कारवाही केली जाईल का ? याकडे या ग्राम पंचायत ग्रामस्थ व पंचक्रोशीसह तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे.
रोहा तालुक्यात “श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत” त्यात लाखोंची उलाढाल अशी मोठी ओळख असल्याने नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने सातत्याने गाजत असलेली ही ऐनघर पंचायत सदरच्या ग्राम पंचायत समितीमध्ये अनागोंदी कारभार तसेच भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी म्हणून येथील युवा कार्यकर्ते व संबंधीत ग्रामस्थ नागरिकांनी अनेकदा मागणी केली तसेच संबधित अधिकारी वर्गांकडे तक्रारी अर्ज देखील केले मात्र उशिरा की होईना अखेर शासनाने याची गंभीरपणे दखल घेत चौकशी सुरू केल्याने यात चक्क दोषी आढळत असल्याने या ग्राम पंचायतचे कारभारी आता भीतीपोटी दफ्तर पळवापळवी अथवा ते गायब प्रकरण चांगलेच तापले असून यात चक्क दोषी आढळून येत असलेल्यांवर कठोर कारवाही करण्यात यावी म्हणून याकरता येथील ग्रामस्थ नागरिक अधिक मागणी करत आहेत.
दरम्यान यासंदर्भात मागील पाच ते सहा महिन्यांपासून या ग्राम पंचायतच्या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी अर्जाबाबत रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी जी.एल. वायाळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे तसेच त्यांच्या कडून चौकशी देखील सुरू आहे मात्र मागील अर्जाच्या तपशिल नुसार चौकशी सुरू असतांनाच जो मोलाचा समजला जाणारा दस्ताचा दफ्तर चोरी प्रकरण उघड झाला आहे ,
आशा या गलथान आणि अनागोंदी कारभाराची अधिक चौकशी करावी तसेच दप्तर चोरी प्रकरणी दोषींवर अधिक लवकरात लवकर कारवाही करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ नागरिकांनी रोहा गट विकास अधिकारी यांच्या कडे निवेदनातून केली आहे .
Comments
Post a Comment