मुंबई-गोवा हायवे वरील रस्त्याची परिस्थिती बिकट,गणेश उत्सवाच्या स्वागताला खड्डयांचे विघ्न,अपघाताचा धोका वाढला,
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील परिस्थिती अतिशय बिकट झाली असून या महामार्गा वरून प्रवास करणे धोकदायक झाले आहे.यामुळे या महामार्गाचा वनवास केव्हा संपले अशा संतपत प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातुन व्यक्त करण्यात येत आहेत.
गणेश उत्सवाला फक्त चार दिवस राहिले असल्यामुळे मुंबई येथील चाकरमानी लाखोच्या संख्येने गणपती उत्सवासाठी गावाकडे निघाले आहेत परंतु मुबंई-गोवा हायवे वरील कोलाड कुंडलिका नदीवरील दोन्ही पुलावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत याचा त्रास प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे तसेच पुई गावाच्या हद्दीतील महिसदरा नदीवर पुलाची परिस्थिती तर अतिशय भयानक आहे गेली पंधरा दिवसापासून या पुलाचे काम सुरु असुन या पुलावरील रस्त्या पूर्णपणे खोदून ठेवला आहे यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असुन या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहे यामुळे प्रवाशी वर्गाला गावाकडे जाण्यास विलंब होत आहे.
तर या महामार्गालगत पुगाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यात तर वाहन अडकून पडून अपघात होत आहे या महामार्गावरील खड्ड्यामुळे असणाऱ्या बिकट परिस्थितीची दररोज वृत्तपत्रातून बातम्या प्रकाशित होत आहेत.नंतर दररोज माती मिश्रित खडी टाकून खड्डे भरले जात आहेत परंतु तरीही परिस्थिती जैसेथे अशीच आहे.या महामार्गासाठी गेली दहा वर्षा पासुन करोडो रुपये खर्च केले आहेत.परंतु कामात कोणतेही प्रगती नाही.यामुळे या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले जिव गमवावे असुन असे किती प्रवाशी वर्गाचे नाहक जिव गेल्यावर रस्त्याचे काम पुर्ण होईल अशी संतपत प्रतिक्रिया प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.?
Comments
Post a Comment