माणगाव प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या चेअरमन पदी श्री.समीर धाडवे, यांची बिनविरोध निवड झाल्याने  शिक्षकांमध्ये समाधानाचे  वातावरण,                

सर्व  स्तरातुनअभिनंदनाचा वर्षाव,

श्री समीर धाडवे सर 
                                                                                                 माणगाव (प्रतिनिधी )                                            माणगाव तालुक्यातील शिक्षकांची   कामधेनू म्हूणन  ओळखली जाणारी आणि अडी अडचणीला     हक्काने मदतीला धावून येणारी शिक्षक पतपेढी आहे.या पतपेढीच्या चेअरमन पदी श्री.समीर धाडवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.श्री.समीर धाडवे सर हे माणगाव तालुक्यात अलसुंदे,नवशी, बामणोली,पानोसे, जिते या शाळांवर आपला ठसा उमटविला आहे.मनमिळावू आणि विद्यार्थीप्रिय म्हणून ते मुलांमध्ये प्रिय आहेत.तंत्रस्नेही असल्याने अनेक तंत्रज्ञानाचे धडे विद्यार्थी आणि शिक्षकांना दिले आहेत.

त्यांच्या तंत्रज्ञानामुळे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्वामुळे आपल्या संस्थेच्या चेअरमन पदी श्री.समीर धाडवे सर यांची निवड झाल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थीप्रिय शाळेच्या विकासासाठी झोकून देणारे ,शिक्षकांच्या पेचप्रसंगात धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्त्व असल्याने धाडवे सरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog