सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड विभागातील आदिवासी बांधवांना धान्य किट वाटप

    गोवे-कोलाड (विश्वास निकम )                                   सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्या आदेशानुसार कोलाड विभागातील आदिवासी बांधवांना धान्य किट वाटप करण्यात आले. चिंचवली आदिवासीवाडी, तळवळी आदिवासीवाडी,आंबेवाडी आदिवासीवाडी, पुई आदिवासीवाडी,कोलाड आदिवासीवाडी,पाले बुद्रुक आदिवासीवाडी आदी सात आदिवासी वाड्यांना एकूण ५५०आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना धान्य किट वाटप करण्यात आले.

            यावेळी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राकेश शिंदे,आंबेवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्रीकांत चव्हाण,गणेश वाचकवडे, संजय सानप, सतिश मानकर, महेंद्र वाचकवडे,कुमार लोखंडे,राकेश लोखंडे, वसिम नुराजी, विजय बागुल, महेश पवार, महेंद्र पानसरे, बाळा महाबळे, निलेश महाबळे, संजय मांडलुस्कर, संदीप जाधव, आदींच्या समवेत आदिवासी बांधवांना धान्यकिट वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog