भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार जागीच ठार चालक फरार
दुचाकीस्वाराचा एक महिन्यापूर्वी झाला होता साखरपुडा
कोलाड ते विळा ट्रेलर अपघाताची मालिका सुरूच
ट्रेलर अपघात, वेगावर नियंत्रण या साठी लोकप्रतिनिधी भांडत नाहीत भांडतात ते फक्त आणि फक्त भंगारा साठी जनतेत चर्चा
दुर्घटनेने सर्वत्र हा हा कार ,
सदर दुचाकीस्वार (मयत) मंगेश हिलम याचा एक महिन्यापूर्वी साखरपुडा झाला होता. तो कुटुंबातला कमवता एकुलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी व आई-वडील आहेत त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर याबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोलाड कडून सुतारवाडीकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच 48 ए जी 5370 तर सुतारवाडी कडून येणारी दुचाकी वाहन क्रमांक एम एच 06 ए व्ही 2539 चालक मंगेश प्रकाश हिलम रा. निळज माणगाव वय (20) सुतारवाडी कडून कोलाडच्या दिशेने येत असतांना ढोकळेवाडी येथील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार मंगेश हिलम यांच्या दुचाकीला थेट जोरदार धडक दिल्याने या दुर्घटनेत मंगेश हिलम यांचा दुर्दैवी अंत झाला असून मालवाहू ट्रेलर चालक हा पसार झाला असल्याने या बाबत एकच संतप्त व्यक्त केला जात आहे .
सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून कोलाड पोस्टे गुरनं 0077/2021 भा द वी कलम 304 अ 279 ,337,338,मोटार वाहन अधिनियम 1988,184,134 प्रमाणे या घटनेची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली सहा. फौ. एस आर माने अधिक तपास करत आहेत .
कोलाड विळे रस्त्याला अपघातांची मालिका सुरूच
लोकप्रतिनिधी फक्त आणि फक्त भंगारासाठीच भांडत असल्याची जनतेत चर्चा.........
कोलाड विळा रस्त्याला पोस्को कंपनीत कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर मुळे अनेक अपघात घडले आहेतआणि अनेकांचा मृत्यूही झालेला आहे बेदारक पणे ट्रेलर चालवीणाऱ्या ना आवर कोण घालणारया रस्त्याला पास्को कंपनीत कॉईल घेऊन जाणारे ट्रेलर मुळे अनेकांचा मृत्यू झालेला आहे याकडे अपघाता कडे कोणीही लोकप्रतिनिधी आवाज उठवीत नाहीत आवाज उठवतात ते कंपनीतील भंगारासाठी येथे जनतेच्या हितासाठी, जनतेच्या भवितव्यासाठी, कोणीही भांडत नाहीत. भांडतात ते फक्त कंपनीतल्या भंगारा साठी अशी जनतेत चर्चेला ऊत आले असून अशी चर्चा गावागावात नाक्यानाक्यावर कानावर येत आहे
जो वक्ती फरार झाला आहे त्यावर कडोर कारवाई केली पाहिजे . त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे
ReplyDeleteहोय नक्कीच शिक्षा मिळाली पाहिजे
Delete