शिक्षक सेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख पदी गणेश पवार यांची नियुक्ती
रायगड जिल्ह्यात होतोय अभिनंदनाचा वर्षाव
माणगाव ( राजन पाटील )आगामी होणाऱ्या विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीला आज शिक्षण क्षेत्रातील जाण नसणारे अनेक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी घुडघ्याला बाशिंग बांधून आहेत मात्र आजच्या मितीस शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापक ,शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थाचालक यांची अनेक प्रश्न महाराष्ट्र शिक्षक सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना
गोरेगाव येथील शासकीय विश्रामगृहात शिक्षकांचे अनेक प्रश्न समजून घेण्याच्या सत्रात दक्षिण रायगडातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूंचे प्रश्न सोडवण्यासाठी साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा लोकमान्य ज्ञानदिप विद्या मंदिराचे सर्वेसर्वा श्री.गणेश नारायण पवार यांची शिक्षक सेनेच्या दक्षिण रायगड संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिक्षक सेना रायगड जिल्हा अध्यक्ष श्री.रविंद्र पाटील ,पेण तालुका अध्यक्ष श्री .मोकल सर ,माणगाव तालुका अध्यक्ष श्री.चंद्रकांत आधिकारी ,उपाध्यक्ष श्री.नितीन नवगणे ,श्री.रविंद्र भगत,श्री .राजन पाटील ,विद्याधर जोशी आदि .मान्यवर उपस्थित होते.
सदर गणेश पवार यांची शिक्षक सेना दक्षिण रायगड संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याचे कळताच रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार भिवा पवार व रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
गणेश पवार यांची शिक्षक सेना दक्षिण रायगड संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याने रायगड जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.श्री.गणेश पवार हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत.त्यांच्या ग्रामपंचायत हद्दीत ,तालुक्यात शिवसेनेला उभारी मिळण्यासाठी अनेक वेळा मोलाचे योगदान दिले आहेत.तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी साई पंचक्रोशीत गरीब ,गरजू ,वंचित समाजाच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेपर्यंत चे शिक्षण घेता यावे याकरिता शैक्षणिक संकुल निर्माण केले आहे. आज मितिस ते माणगाव तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मा .अध्यक्ष आहेत तसेच माणगाव तालुका जूनी पेन्शन हक्क संघटनेचे मा.उपाध्यक्ष आहेत.
अशा या बहुआयामी व्यक्तीची शिक्षक सेना दक्षिण रायगडच्या संपर्क पदी श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी नियुक्ती केल्याने सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.आता माणगाव तळा ,महाड ,पोलादपूर ,म्हसळा ,श्रीवर्धन ,रोहा या तालुक्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधूंचे सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे मत श्री.गणेश पवार यांनी सांगितले.
Comments
Post a Comment