सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड हायस्कूलला विविध वस्तूंचे वाटप
कोलाड ( विश्वास निकम ) सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या संकल्पनेतून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड या विद्यालयाला विद्यार्थ्यांसाठी मास्क, सेनिटायझर, हँडग्लोज आदी वस्तू सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानतर्फे देण्यात आल्या.
सोमवार पासून काही वर्ग सुरु झालेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सदरी वस्तू देण्यात आल्या. सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राकेश शिंदे यांच्याकडे वरील वस्तूंची मागणी करण्यात आली होती. राकेश शिंदे यांनी खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित वस्तूंचे वाटप केले.
द.ग तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाडचे मुख्याध्यापक श्री शिरीष येरूणकर यांच्याकडे वरील वस्तूंचे कीट देण्यात आले. यावेळी श्रीकांत चव्हाण, महेंद्र वाचकवडे, गणेश वाचकवडे, शैलेश सानप, अविनाश पलंगे, समीर शिंदे, आकाश भिंगारे, कमलेश कदम, रोहित शिंदे, त्याचप्रमाणे कोलाड हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सोमवारपासून माध्यमिक हायस्कूलचे काही वर्ग सुरू केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदरील साहित्य सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून दिल्या बद्दल घोणे सरांनी विद्यालयातर्फे आभार मानले तसेच पालकांनीही धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment