अकोल्यात गुप्त सापळा रचून गुरे कत्तलीसाठी नेणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश, आरोपी अटक,
कत्तलीसाठी नेण्यात येणार्या नऊ जनावरांना जीवदान,
पिंजर पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन,
अकोला ( संजय चव्हाण )
अकोला जिल्हातील बार्शिटाकळी तालुकामधील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुरे कत्तलीसाठी नेत असताना सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या या कारवाईबाबत पिंजरपोलीस स्टेशनच्या पोलिसांचे संपुर्ण अकोला जिल्ह्यात कौतुक होत आहे.
याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार असे की पिंजर पोलीस स्टेशनला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार असे की एका पिकअप मध्ये गुरे कत्तलीसाठी नेत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार सदर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष हिरुळकर बॅच नं 1573, भिका जाधव बॅच नंबर 387, ज्ञानेश्वर राठोड बॅच नं.18 93 भगवान शिंदे बॅच नं. 23 40 पंकज एकाडे बॅच नंबर 23 44 यांनी मंगरुळपीर ते बार्शिटाकळी महामार्गांवर ठीक सात वाजता गुप्त सापळा रचला असता एका पिकअप मध्ये नऊ जनावरांना घेऊन पिकअप चालक आरोपी अब्दुल मतीन नबी वय वर्ष 25 राहणार महान हा येत असताना त्याला रंगेहाथ बेड्या ठोकल्या असून सदर आरोपी वर कलम (क) 55,( प) 5, (ब )9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास प्रधान साहेब भगवान मात्रे, बॅच नं.1369 पंकज एकाडे बॅच नं. 23 44 हे करीत असून अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर पोलिसांच्या धडकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
खूप छान बातमी लागली सर
ReplyDelete