माणगाव तालुक्यातील येरद (शितोळ) आदिवासी वाडी येथे हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन उत्साहात संपन्न
जल- जंगल- जमीन यांच्यावर फक्त आदिवासींचाच अधिकार नाग्याबाबा अमर रहे घोषणानी येरद परिसर दुमदुमला
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रबोधनाचा कार्यक्रम लहान आदिवासी मुलांसाठी खेळणी ग्रंथालयाचे उद्घाटन
निजामपूर (प्रतिनिधी )महात्मा गांधीजींच्या विचारानीं प्रेरित झालेल्या तसेच 1930 जंगल सत्याग्रह मध्ये भाग घेऊन हुतात्मा झालेले तसेच आदिवासी समाजाच्य समाजाचे शिरोमणी, आदर्श असणारे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांचा स्मृतिदिन माणगाव तालुक्यातील निजामपूर जवळील येरद शितोळ आदिवासींमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.वाडीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राम जाधव यांच्या हस्ते हुतात्मा नाग्या बाबा व भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच मैत्रकुल जिनियस परिवाराच्या वतीने देशभक्तीपर गीत गायन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार भिवा पवार यांनी आदिवासी आदिवासी बांधवांनी शिक्षण घेतले पाहिजे शिक्षण घेऊन आपण आपल्या समाजासाठी काम केलं पाहिजे, नाग्या बाबांना आपले आदर्श मानले पाहिजे असे सांगून अनेक उदाहरणे दिली आणि समाज संघटित होण्यासाठी आपण एकत्र येण्याचे आवाहन केले.
दक्षिण रायगड जिल्हा आदिवासी हितरक्षक संघटनेचे सचिव संतोष वाघमारे यांनी आदिवासी मुलांनी शिकून आपला इतिहास उजेडात आणावा या साठी शिक्षण घेणे महत्त्वाचा आहे व्यसनापासून दूर रहा तरच आपला विकास होईल असे मार्गदर्शनपर भाषणात सांगितले
यावेळी जिनियस मैत्रकुल गणाईचे संस्थापक किशोर दादा गणाई यांच्या 54व्या वाढदिवसा निमित्ताने आदिवासी मुलांसाठी खेळणी ग्रंथालय साहित्याचे उद्घाटन रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेने संघटनेचे जिल्हाध्यक्ष पत्रकार भिवा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हुतात्मा नाग्या बाबांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले.
यावेळी दक्षिण रायगड इतर रक्षक आदिवासी संघटनेचे अध्यक्ष उमेश जाधव, सचिव संतोष वाघमारे येरद( शितोळ) गावचे अध्यक्ष व वनमित्र राम कोळी उपाध्यक्ष मारुती जगताप सचिव ज्ञानेश्वर पवार खजिनदार लक्ष्मण पवार नारायण पवार महादेव वाघमारे रमेश जाधव राम वालेकर वनमित्र सल्लागार राम जाधव, कुशन जगताप, शंकर वाघमारे तसेच ग्रामस्थ संतोष वाघमारे यशवंत वाघमारे सदा वालेकर श्रावण वाघमारे रघुनाथ जाधव शांताराम जगताप,गणपत मढवी गणपत मांढरे बाळकृष्ण कोळी दशरथ जाधव आदी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच जिनियस मैत्रकुल छात्रशक्ती संस्था खजिनदार विजेताताई गणाई, मैत्रकुल प्रमुख संचालक तेजस गणाई, तसेच दक्षिण रायगड आदिवासी संघटना युवा कार्यकर्ते केशव वाघमारे कार्यकर्ते महिला मंडळ वैदेही राम कोळी, जयवंती जाधव वन मित्र महिला बचत गट,महिला मंडळ,व ग्रामस्थ मंडळ येरद (शितोळ ) ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment