श्रीमती अर्पिता रॉय श्रीवास्तव ग्लॅमरस पब्लिक स्पिकर पुरस्काराने सन्मानित
मुंबईप्रतिनिधी
03 सप्टेंबर 2021 रोजी कोर्टयाड मेरीयट, मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ग्लॅमर प्रोजेक्ट या उपक्रमा अंतर्गत ही निवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये 47 सौन्दर्यवतींनी भाग घेतला होता. अर्पिता रॉय यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, सौन्दर्य, सामाजिक, शैक्षणिक कार्य, जनसंपर्क कौशल्य, सामान्य ज्ञान, निर्णय क्षमता इत्यादी गुणांचे परीक्षण करण्यात आले होते.
केवळ शरीराने सुंदर असून चालत नाही, मन आणि कार्य ही सुंदर असावे लागते हेच या निवडीतून निदर्शनास आले आहे. श्रीमती समीरा मर्चण्ट यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. प्रा. सुभाष सर, अजय प्रकाश यांनी रॉय यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment