सामाजिक कार्यकर्त्यां सुरेखा पवार यांचे दुःखद निधन
गोवे -कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवासी सुरेखा धर्मा पवार यांचे गुरुवार दि.१९/०८/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७४ वर्षाचे होते.त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वरूपाने सर्वाना परिचित होत्या.त्या सर्वांशी मिळुनमिसळून राहत होत्या व सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय होत्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताiच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रायगड जिल्हा भोई समाजाचे कार्यकर्ते, तसेच बहुजन समाजाचे विविध स्थरावरील मान्यवर,आप्तस्वकीय व गोवे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती धर्मा पवार,मुलगा सहेंद्र ,तीन मुली, सुना, पुतणे, नातवंडे व मोठा पवार कुटुंब आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य विधी दोन्ही एकाच दिवशी शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी त्यांच्या गोवे येथील राहत्या निवासस्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment